नवी दिल्ली - शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 3.7 लाख कोटींची आज घसरण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाली आहे. त्याचा गुंतवणुकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे आज 3,71,883.82 कोटी रुपयांवरून 2,00,26,498.14 कोटी रुपये भांडवली मूल्य झाले आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 19 फेब्रुवारीला 2,03,98,381.96 कोटी रुपये होते.
मुंबई शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी आज घसरण झाली आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजार 1,145 अंशाने घसरून 49,744.32 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 306.05 अंशाने घसरून 14,675.70 वर स्थिरावला.
हेही वाचा-संगमनेरच्या ग्रुपकडून करचुकवेगिरीचा संशय; आयटी विभागाचे राज्यात ३४ मालमत्तांवर छापे
कॅप्टिलव्हिवा ग्लोबल रिसर्चचे तंत्रज्ञान संशोधन प्रमुख आशिष विश्वास म्हणाले की, निफ्टी 50 निर्देशांक 14,750 चा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरला आहे. शेअर बाजारामधील व्यवहारांमध्ये नफा नोंदविण्याकडे कल दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले. बीएसई उर्जा, रिअल्टी, आयटी, टेक, ऑटो आणि कॅपिटल गुडच्या शेअरमध्ये 2.92 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर मेटल आणि बेसिक मटेरियल्सचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सलग दुसऱ्या दिवशी 'ब्रेक'