नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ४४,५०९ रुपयांनी वाढले आहेत. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४४,४०४ रुपये होता.
दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर १०५ रुपयांनी वाढले आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी म्हटले आहे. चांदीची किंमत प्रति किलो १,०७३ रुपयांनी वाढून ६७,३६४ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,२९१ रुपये होता.
हेही वाचा-शेअर बाजारात दिवसाखेर ५८५ अंशाने पडझड; टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण
या कारणाने सोन्याचे वाढले दर-
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दामानी म्हणाले की, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने लवचिक भूमिका स्वीकारल्यानंतर सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक २०२३ पर्यंत व्याजदर जवळपास शून्य टक्के ठेवेल, अशी गुंतवणुकदारांना अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याचे दर अंशत: वाढून प्रति औंस १,७३८ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.३६ डॉलर आहेत.
हेही वाचा-चारच दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांनी गमाविले ५.५ लाख कोटी!