नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा ३०२ रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४४,२६९ रुपये आहे. जागतिक बाजारात घसरलेले सोन्याचे दर आणि रुपयाचे वाढलेले मूल्य या कारणांना सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,५७१ रुपये होता. चांदीच्या दरात प्रति किलो १,५३३ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो ६६,८५२ रुपयांवरून ६५,३१९ रुपये आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर ८७ अंशाने घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: घसरून प्रति औंस १,७३१ डॉलर आहे. तर चांदीचे दर घसरून प्रति औंश २५.५५ डॉलर आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज( तपान पटेल म्हणाले की, सोन्याच्या किमतीवर दबाव आहे. कारण, ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष हे या आठवड्यात अमेरिकेच्या रोख्यांचे होणाऱ्या लिलावाकडे लागलेले आहे.
हेही वाचा-गुगल मॅपमध्येही डार्क थीम उपलब्ध; अँड्राईड वापरकर्त्यांना मिळणार सुविधा