नवी दिल्ली - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (10 ग्रॅम) 49 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीत दिल्लीत सोने प्रति तोळा 43,925 रुपये आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घसरणीच
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 331 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर 62,772 रुपयांवरून 62,441 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये कमोडिट एक्सचेंजमध्ये सोन्याच्या विक्रीत वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर घसरले आहेत.
हेही वाचा-पॅन-आधार लिंक नसेल तर 10 हजारापर्यंत भरावा लागू शकतो दंड; आज शेवटची तारीख
रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 20 पैशांनी घसरून एका डॉलरसाठी बुधवारी 73.58 रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंससाठी 1,684 डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंससाठी 24.09 डॉलर आहेत. अमेरिकेतील अर्थव्यवस्था सावरत असताना डॉलरचे मूल्य बळकट होत आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरल्याचेही पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्न प्रक्रिया क्षेत्राकरता पीएलआय योजनेला मंजुरी
दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते.