ETV Bharat / business

डिझेलचा दर प्रति लिटर १२ पैशांनी कमी; पेट्रोलचे दर स्थिर - Fuel rate update news

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर १६ ऑगस्टला ८०.५७ रुपये होता. दिल्लीत पेट्रोलचा दर आज ८२.०८ रुपये आहे.

डिझेलचा दर
डिझेलचा दर
author img

By

Published : Sep 7, 2020, 4:07 PM IST

नवी दिल्ली - सरकारी खनिज तेल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलचे दर कमी केले आहेत. दिल्लीत डिझेलचे दर प्रति लिटर ११ पैशांनी कमी झाले आहेत. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ७३.१६ रुपये आहे. तर पेट्रोलचे दर स्थिर राहिले आहेत.

डिझेलचा दर गुरुवारीही प्रति लिटर १६ पैशांनी कमी झाला होता. तर शनिवारीही डिझेलचा दर प्रति लिटर १३ पैशांनी कमी झाला होता. डिझेलचे दर कमी होत असताना पेट्रोलचे दर कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. पेट्रोलचे दर जवळपास महिनाभर स्थिर ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी १६ ऑगस्टपासून पेट्रोलचे दर नियमितपणे वाढले होते.

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर १६ ऑगस्टला ८०.५७ रुपये होता. दिल्लीत पेट्रोलचा दर आज ८२.०८ रुपये आहे.

हेही वाचा-जिओपाठोपाठ एअरटेलचा अमर्यादित ब्रॉडबँड प्लॅन जाहीर; 'या' मिळणार सुविधा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खनिज तेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमती कमी होण्याची किंवा दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-'भारताच्या जीडीपीतील घसरण ही प्रत्येकासाठी धोक्याची घंटा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.