नवी दिल्ली – डेलने 'लॅटिट्यूड 7410 क्रोमबुक एन्टरप्रायझेस लॅपटॉप' लाँच केला आहे. हा लॅपटॉप निवडकबाजारात 1 हजार 299 डॉलरला उपलब्ध होणार आहे. तर इंटेल आय 3 प्रोससरचा लॅपटॉप लवकरच 1,099 डॉलरला उपलब्ध होणार आहे. नव्या लॅपटॉपची भारतामधील किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
डेल टेक्नॉलॉजीसचे उपाध्यक्ष (वाणिज्य उत्पादन) राहुल टिकू म्हणाले, की आमचे लॅटिट्यूड क्रोमबुक एन्टरप्रायझेस हे कर्मचारी आणि आयटी मॅनेजर दोन्हींसाठी डिझाईन केलेले आहे. त्यामध्ये उद्योगांसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टमचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना डिझाईन आणि फीचर आवडणार आहेत. तर आयटी व्यवस्थापकांना व्यस्थापन आणि सुरक्षेच्या वैशिष्ट्यामुळे कॉर्पोरेट वातावरण काम करणे शक्य होणार आहे.
यामध्ये एलटीई मोबाईल ब्रॉडबँड, इंटेल वायफाय6 आणि 10 जेन उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंटेल कोअर आय7 प्रोससरचा उपयोग उत्पादकता आणि बँडविथची क्षमता वाढविण्यासाठी उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ गुगल शीटचा 8.6 टक्क्यांनी अधिक वेगाने वापर करता येणार आहे.
लॅपटॉपची 21 तास बॅटरी टिकू शकते. तर शून्य चार्जिंग असताना 35 टक्क्यापर्यंत चार्जिंग होण्यासाठी 20 मिनिटे तर 80 टक्क्यापर्यंत चार्जिंग होण्यासाठी एक तास लागतो. एवढ्या कमी वेळात लॅपटॉप चार्ज होण्यासाठी एक्प्रेसचार्ज बुस्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे डेलने म्हटले आहे.