ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार ८४८ अंशांने वधारला ; 'हे' आहे कारण - मुंबई शेअर मार्केट अपडेट

जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार म्हणाले, की अमेरिकेतील महागाई दर्शविणारी आकडेवारी आणि भारताच्या कोरोनास्थितीची आकडेवारी यांचा बाजारावर मोठा परिणाम होत आहे. देशामध्ये नवीन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे.

Sensex
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : May 17, 2021, 4:21 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ८४८ अंशांने वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २४७ अंशांने घसरला आहे. कोरोनाबाधितांचे कमी झालेले प्रमाण आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थिती या कारणांनी शेअर बाजारात तेजीचे चित्र आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८४८.१८ अंशाने वधारून ४९,५८०.७३ वर स्थिरावला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २४७.३५ अंशाने वधारून १४,९२५.१५ वर स्थिरावला होता.

हेही वाचा- शिल्पा केअरचा डॉ. रेड्डीजबरोबर करार; पहिल्या वर्षी ५ कोटी 'स्पूटनिक व्ही'चे घेणार उत्पादन

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

इंडइंड बँकेचे सर्वाधिक सुमारे ७ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे एल अँड टी, भारती एअरटेल, सन फार्मा आणि मारुतीचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा- कोव्हॅक्सिनचे दर महिन्याला १० कोटींहून अधिक होणार उत्पादन; तीन सार्वजनिक कंपन्यांबरोबर करार

एफआयआयकडून शुक्रवारी २,६०७.८५ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री

मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४१.७५ अंशांने वधारून ४८,७३२.५५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १८.७० अंशाने वधारून १४,६७७.८० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) भांडवली बाजारात शुक्रवारी २,६०७.८५ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.

नवीन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी

जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार म्हणाले, की अमेरिकेतील महागाई दर्शविणारी आकडेवारी आणि भारताच्या कोरोनास्थितीची आकडेवारी यांचा बाजारावर मोठा परिणाम होत आहे. देशामध्ये नवीन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे सध्याचे लॉकडाऊन हे तात्पुरते आहे. त्यामुळे बाजाराने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे व्ही. के. विजयकुमार यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.