नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन ग्राहकांना खरेदीत सवलती देणारा ‘प्राईम डे’ आयोजित करणार आहे. यंदा हा 'प्राईम डे' सहा ते सात ऑगस्टदरम्यान देशात शॉपिंगकरता खुला होणार आहे.
गेल्यावर्षी प्राईम डे हा जुलैमध्ये सुरू करण्यात आला होता. यंदा कोरोना महामारीमुळे कंपनीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यामुळे कंपनीने दरवर्षी एकाच दिवशी जगभरात सुरू ठेवण्यात येणारा 'प्राईम डे' हा पहिल्यांदाच वेगवेगळ्या दिवशी आयोजित केला आहे. या प्राईम टाईममध्ये ग्राहकांना विविध खरेदीमध्ये 6 आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून सात आॅगस्टपर्यंत सवलती मिळणार आहेत.
प्राईम डे या दिवशी खरेदी करणे हे प्राईम सदस्यासाठी विशेष दिवस साजरा करण्यासारखे आहे. दरवर्षी आम्ही 'प्राईम डे'कडे नव्याने पुढे पाहत असतो, असे अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.