पणजी - गोव्याला विशेष वागणूक द्यावी, अशी मागणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. खाण उद्योग क्षेत्र कार्यरत नसल्याने सागरी किनाऱ्यावर असलेल्या गोव्याला कायदेशीर दिलासा द्यावा, असे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ते नीती आयोग्याच्या बैठकीत ऑनलाईन बोलत होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा हे देशातील सर्वात लहान राज्य आहे. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र असल्याने विकासासाठी कमी भूक्षेत्र आहे. हरित कायदे आणि सागरी किनाऱ्याच्या नियमनातून लहान राज्यांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. खाणींचे काम पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने खाणींच्या उत्खननावर बंदी लागू केली आहे.
हेही वाचा-हुवाई स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्के करणार घट
पुढे मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात. अशी आमची विनंती आहे. गोव्याच्या प्रकरणाला वेगळी वागणूक द्यावी. आम्हाला १९६१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. मात्र, खाणी दुसऱ्यांदा भाड्याने देण्याची परवानगी मिळाली नाही, असे सावंत यांनी ऑनलाईन बैठकीत म्हटले आहे.
हेही वाचा-'सीएसआर कायद्याने बंधनकारक नको, उत्स्फूर्तपणे असावे'