मुंबई - नोटा जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी आरबीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआय प्रायोगिक पातळीवर १०० रुपयांच्या वारनिश नोटा चलनात आणणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयने वार्षिक अहवालात दिली आहे. वारनिश नोटा या प्लास्टिकप्रमाणे असतात. त्या दीर्घकाळ टिकतात.
आरबीआयने वार्षिक अहवाल २०१७-१८ मध्ये वारनिश नोटांची माहिती दिली होती. वारनिश नोटांचे आयुष्य हे अधिक असते, हे आंतरराष्ट्रीय अनुभवावरून दिसून येत असल्याचे आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले होते.
हेही वाचा-ट्विटरकडून ब्ल्यू बॅजची पडताळणी बंद; पुन्हा प्रक्रिया करणार सुरू
- आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार मार्च २०१९ अखेर १० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचा चलनात ४७.२ टक्के हिस्सा आहे. तर मार्च २०१८ अखेर १० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचा हिस्सा चलनात ५१.६ टक्के हिस्सा होता.
- अंध किंवा अंशत: अंध व्यक्तींना नोटांची सत्यता पडताळणी सोपे होण्यासाठी आरबीआयकडून काम सुरू आहे. यामध्ये इन्टाग्लिओ प्रिंटग, टॅक्टिल मार्ग, नोटांचे विविध आकार, मोठ्या आकारात अक्षरे, विविध रंग आणि मोनोक्रोमॅटिक ह्यू आणि पॅटर्नचा समावेश असेल, अशी माहिती आरबीआय वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
- कोरोनाच्या काळात चलनात रोख रकमेचे प्रमाण वाढले आहे. कोरोना काळात लोकांमध्ये रोख रक्कम जवळ बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा-केंद्राकडून राज्यांना होणारा रेमडेसिवीरचा पुरवठा थांबणार
दरम्यान, वारनिश नोटा या पाण्यात भिजल्या तरी खराब होत नाहीत. त्या फाटत नाहीत. अशा नोटांचा टिकाऊपणा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक असतो.
१०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची पसरली होती अफवा-
भारतीय रिझर्व्ह बँक येत्या काळात १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करणार असल्याची माहिती आरबीआयचे महाप्रबंधक बी. महेश यांनी कर्नाटकमधील एका कार्यक्रमात जानेवारी २०२१ मध्ये दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून १०० रुपयांच्या महात्मा गांधी श्रेणीतील जुन्या नोटा आरबीआयने छापणे बंद केल्याचा दावाही बी. महेश यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर १०० रुपयांसह १०, ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होती. हे वृत्त फेटाळून लावत आरबीआयने ट्विटने करत चुकीची माहिती असल्याचे म्हटले होते.