ETV Bharat / business

RBI Governor on Cryptos : क्रिप्टोचलनाचा वित्तीय स्थिरतेला धोका; क्रिप्टोला ट्युलिप एवढीही किंमत नाही- शक्तिकांत दास

author img

By

Published : Feb 10, 2022, 5:53 PM IST

क्रिप्टोचलनाला ट्युलिप फुलाएवढेही ( RBI governor on Crypto value ) मूल्य नाही, असा इशारा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणुकदारांना दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोचलनसारख्या डिजीटल मालमत्तांवर 30 टक्के कर लागू करण्याचा ( Taxes on digital assets in Budget 2022 ) निर्णय घेतला आहे. त्यानंतर क्रिप्टोचलनाच्या व्यापाराला वैधता मिळाल्याने ट्रेडर समुदायाकडून स्वागत करण्यात आले होते.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास

मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाच्या बैठकीत क्रिप्टोचलनाबाबत भूमिका ( RBI Governor on Cryptos ) स्पष्ट केली आहे. क्रिप्टोचलनाचा अर्थव्यवस्थेला आणि वित्तीय स्थिरतेला धोका ( Cryptos a threat to financial stability ) आहे. आघाडीवर असलेल्या आव्हानांशी सामना करण्याची क्षमता क्रिप्टोचलनाने कमी होत असल्याचे मत शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते.

क्रिप्टोचलनाला ट्युलिप फुलाएवढेही ( RBI governor on Crypto value ) मूल्य नाही, असा इशारा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणुकदारांना दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोचलनसारख्या डिजीटल मालमत्तांवर 30 टक्के कर लागू करण्याचा ( Taxes on digital assets in Budget 2022 ) निर्णय घेतला आहे. त्यानंतर क्रिप्टोचलनाच्या व्यापाराला वैधता मिळाल्याने ट्रेडर समुदायाकडून स्वागत करण्यात आले होते.

हेही वाचा-Union Budget 2022 : सरकारचे नियंत्रण यावे यासाठी क्रिप्टो चलनाबाबत पाऊल उचलले - अर्थतज्ज्ञ

खासगी क्रिप्टोचलन अथवा तुम्ही त्याला कोणतेही नाव द्याल असे क्रिप्टोचलन हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेला आणि वित्तीय स्थिरतेला धोका आहे. गुंतवणुकदारांना सावध करणे, आपले कर्तव्य असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. तुमच्या जोखीमवर गुंतवणूक करा, हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-Cryptocurrency Mining Banned : खर्च १४ हजार, नफा २ लाखांचा.. क्रिप्टोकरन्सीच्या मायनिंगला 'या' देशात बंदी..

काय आहे ट्युलिप मॅनिया?

18 व्या शतकामध्ये डेन्मार्कमध्ये ट्युलिप नावाचा आर्थिक फुगा फुटला होता. प्रत्यक्षात कोणतीही किंमत नसताना एखाद्या वस्तु ही अफवेमुळे वाढत असताना ट्युलिप मॅनिया म्हटले जाते. अशावेळी अफवा पसरविणारे लोक हे मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. क्रिप्टोचलनाबाबतही असेच घडत असल्याचे आरबीआय गव्हर्न दास यांनी सूचित केले आहे.

हेही वाचा-Union Budget 2022 Blue Print : कररचनेत कोणताही बदल नाही, क्रिप्टो चलन येणार; वाचा, तुमच्या पदरात काय?

सलग दहाव्यांदा रेपो दर स्थिर

रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर ( RBI Monetary Policy ) केले आहे. सलग 10 व्यांदा व्याज दरात कोणताही ( Repo Rate and Reverse Repo Rate Remain ) बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी ( RBI Governor Shaktikanta Das ) आज पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. दरम्यान आर्थिक वर्ष 2022-23मध्ये जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज देखील आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

क्रिप्टो चलनावर आता 30 टक्के कर

डिजिटल चलन ( Digital Currency ) किंवा क्रिप्टो चलनाचा ( Cryptocurrency ) जगभरात मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. या क्रिप्टो चलनावर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नव्हते. मात्र, आता क्रिप्टो चलनावर भारत सरकारचे काही प्रमाणात नियंत्रण हवे या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी क्रिप्टो चलनाबाबत पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पानुसार ( Union Budget 2022 ) क्रिप्टो चलनावर आता 30 टक्के कर लावण्यात येणार आहे. तसेच डिजिटल असेटही आयकरच्या ( Income tax ) कक्षेत आणले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.