ETV Bharat / business

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १५ ऐवजी १३ फेब्रुवारीला संपणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाबाबत लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या नेत्यांनी अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारीला संपण्यासाठी एकमताने मंजुरी दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन न्यूज
अर्थसंकल्पीय अधिवेशन न्यूज
author img

By

Published : Jan 30, 2021, 6:39 AM IST

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनेचा पहिले सत्र १५ फेब्रुवारीऐवजी १३ फेब्रुवारीला संपण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले आहे. असे असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा कार्यकाळ तेवढाच राहणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाबाबत लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या नेत्यांनी अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारीला संपण्यासाठी एकमताने मंजुरी दिली आहे. पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र हे १५ फेब्रुवारीला संपणार होते.

हेही वाचा-'मल्टी कमोडिटी एक्सचेंज'मधून सोने-चांदीचा व्यापार वगळावा; सुवर्ण व्यावसायिकांची अपेक्षा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ८ एप्रिलला संपणार आहे. सुत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनी अभिभाषण केल्यानंतर त्यांचे आभार मानण्याच्या ठरावात ही चर्चा करता, येईल, असे सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना सूचविले आहे. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी संसदेचे कामकाज सुरळितपणे चालू राहण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. प्रत्येक सदस्यांना बोलण्याची संधी देईल, असे बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आश्वासन दिले आहे.

हेही वाचा- नवीन कृषी कायद्यांमुळे मुक्त बाजाराचे नवे युग सुरू होणार-आर्थिक सर्वेक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.