नवी दिल्ली - भारतीय सेवा क्षेत्राचा वृद्धीदर दोन महिने घसरल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा वाढला आहे. नव्या व्यवसायाचे आदेश, रोजगार निर्मितीचा वेग, व्यवसायामधील विश्वास बळकट झाल्याने सेवा क्षेत्राचा वृद्धीदर वाढल्याचे आयएचएस मर्किट इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.
आयएचएस मर्किट इंडियाने सर्व्हिस बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्सची नोव्हेंबरमध्ये ५२.७ टक्के नोंद होती. तर ऑक्टोबरध्ये ४९.२ टक्के नोंद करण्यात आली होती. सप्टेंबर व ऑक्टोबरनंतर अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्र नोव्हेंबरमध्ये सुधारल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी पीएमआयचेपरिणाम हे मागणी कमी असल्याचा इशारा सूचित करत असल्याचे आयएचएस मर्किटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलियान्ना डी लामा यांनी म्हटले.
हेही वाचा-'नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जींच्या सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विचारात घ्याव्यात'
सेवा क्षेत्र हे चांगल्या पद्धतीने सुधारत आहे. तर डिसेंबरमध्ये यामध्ये विस्तार होईल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. व्यवसायामधील विश्वासाच्या घसरणीत सातत्य राहिले आहे. महागाई वाढत असताना उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. नोव्हेंबरमध्ये उत्पादन खर्चाच्या सरासरी किमतीत वाढ झाली आहे. दर कमी असल्याने नोव्हेंबरमध्ये मागणी वाढली आहे. मात्र, कंपन्या किती प्रमाणात हा उत्पादन खर्च सोसू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मागणीच्या वृद्धीसाठी नफ्यातही कमी होणार असल्याचे पॉलियान्ना डी लामा यांनी म्हटले.
हेही वाचा-अशोक लिलँडचा उत्पादन प्रकल्प डिसेंबरमध्ये काही दिवस राहणार बंद
एकत्रित पीएमआय आउटपूट इन्डेक्समध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्राचा समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार दुसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर ४.५ टक्के नोंदविण्यात आला.
काय आहे सर्व्हिस बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स ?
सर्व्हिस बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्समधून सेवा क्षेत्रामधील आर्थिक हालचालींची स्थिती निर्देशांकामधून दाखविली जाते. ही माहिती खासगी कंपन्यांचे सर्व्हे करून दर महिन्याला घेतली जाते. यामुळे सेवा क्षेत्राच्या परिस्थितीचे आकलन होणे शक्य होते.