मुंबई - केंद्र सरकारकडून लक्ष्मी विलास बँकेवर अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. पुढील एका महिन्यासाठी ही बंधने असणार आहेत. आता या बँकेतून ग्राहकांना 16 डिसेंबरपर्यंत केवळ 25 हजार रुपयेच काढता येणार आहेत. गेल्या 1 वर्षापासून ही बँक तो़ट्यात होती. बँक व्यावाहारांमध्ये देखील अफरातफर झाल्याचा संशय आहे. म्हणून या बँकेवर बंधने घातण्यात आली आहेत. कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी एन मनोहरन यांना या बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या पूर्वी पीएमसी बँक आणि एस बँकांवर देखील अशीच बंधने घालण्यात आली होती. दरम्यान लक्ष्मी विलास बँकेतून आता ठेवीदारांना एका महिन्यात केवळ 25 हजार रुपयेच काढता येणार आहेत. मात्र लग्न, वैद्यकीय उपचार या सारख्या महत्वाच्या कारणांसाठी बँकेतून पैसे काढणाऱ्या ठेवीदाराला यातून सूट देण्यात आली आहे. लग्न किंवा वैद्यकीय उपचार या सारख्या महत्वाच्या कारणांसाठी ठेवीदार 25 हजारांपेक्षा अधिक पैसे काढू शकतात, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.