ETV Bharat / business

ग्रामीण भागात रोजगार मिळेना; देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ - CMIE data of rural employment

ग्रामीण भागात मजुरांच्या बाजारपेठेची स्थिती ही ऑगस्टमध्ये अत्यंत खराब झाली आहे. तर ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.

संग्रहित- रोजगार
संग्रहित- रोजगार
author img

By

Published : Sep 4, 2020, 12:11 PM IST

हैदराबाद - देशामधील बेरोजगारीचे प्रमाण पुन्हा वाढल्याची आकडेवारी आर्थिक टँक असलेल्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) दिली आहे. सीएमआईच्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचा दर हा ऑगस्टमध्ये वाढून ८.४ टक्के झाला. तर जुलैमध्ये रोजगाराचे प्रमाण हे कोरोनापूर्वीच्या काळाप्रमाणे ७.४ टक्के होते.

ग्रामीण भागात मजुरांची स्थिती ऑगस्टमध्ये अत्यंत खराब झाली आहे. तर ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढल्याचे सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले. ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण ऑगस्टमध्ये ३.६ दशलक्षने कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण हे २.८ दशलक्ष झाले आहे. ज्यांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत, ते मजूर मनुष्यबळाच्या बाजारातून बाहेर पडले आहेत.

हेही वाचा-सोने प्रति तोळा ७७४ रुपयांची स्वस्त; 'हे' आहे दर कमी होण्याचे कारण

  • मजुरांच्या मनुष्यबळाचे प्रमाण हे ग्रामीण भागात ०.८ दशलक्षने घसरले आहे. चालू वर्षात जून आणि जुलैमध्ये मनरेगामधून प्रत्येक मजुराला मिळणाऱ्या कामांच्या दिवसांची संख्या ही जुलैमध्ये गतवर्षीच्या जून-जुलैच्या तुलनेत दुप्पट होती.
  • ऑगस्टमध्ये प्रत्येक मजुराला मिळणाऱ्या कामांच्या दिवसांची संख्या ही गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढली आहे.
  • शेतीच्या कामामुळे मनरेगामधील रोजगाराची संख्या ऑगस्टमध्ये कमी झाल्याचे दिसून आले.
  • खरीपातील पेरणीचे काम जुलैअखेर ८३ टक्के पूर्ण झाले आहे. तर ऑगस्टमध्ये पेरणीचे काम २० टक्क्यांहून कमी झाले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये जून आणि जुलैच्या तुलनेत मनरेगामधील मजुरांची संख्या कमी असू शकते, असे सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले.
  • ग्रामीण भागातून अनेक स्थलांतरीत मजूर हे शहरी भागाकडे वळत आहेत. कदाचित ग्रामीण भागातील रोजगाराचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना शहरातील रोजगाराचे आकर्षण वाटले असावे, असे व्यास यांनी नमूद केले.

हेही वाचा-कर्जाची पुनर्रचना योजना १५ सप्टेंबरपर्यंत सुरू करा; केंद्रीय अर्थमंत्र्यांची बँकांना सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.