नवी दिल्ली - भारतीय सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात सप्टेंबरमध्ये स्थिर राहिले आहे. मात्र, नव्या व्यवसायाचा विचार करता सेवा क्षेत्रात घसरण झाली आहे. कोरोना महामारीचा सेवा क्षेत्रातील मागणीवर आणि नोकऱ्या गमाविण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अॅक्टिव्हिटी निर्देशांक सलग पाचव्या महिन्यात वाढला आहे. हा निर्देशांक ऑगस्टमध्ये ४१.८ वरून सप्टेंबरमध्ये ४९.८ झाला आहे. आयएचएस मर्किट इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सनुसार (पीएमआय) 50 हून अधिक निर्देशांक असेल तर वृद्धीदर मानण्यात येतो. तर ५० हून कमी निर्देशांक असेल तर घसरण मानण्यात येतो. टाळेबंदीचे नियम शिथील केल्याने सेवा क्षेत्रात सुधारणा होण्यास मदत झाल्याचे आयएचएस मर्किटचे प्रमुख अर्थतज्ज्ञ पॉलियान्ना डी. लिमा यांनी सांगितले.
टाळेबंदीचे नियम शिथील झाल्यानंतर अनेक उद्योग सुरू होत आहेत. असे असले तरी सलग नवव्या महिन्यातही सेवा क्षेत्रातील रोजगारात घसरण झाली आहे. वेतन असलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अनेक कंपन्यांकडून अतिरिक्त कामगार सेवेते घतले आहेत. कराण मजुरांची संख्या झाल्याचे पॉलियान्ना डी. लिमा यांनी सांगितले.