नवी दिल्ली - गोपनीयतेबाबत भारत गंभीर आहे. माहितीची गोपनीयतादेखील आमच्या एकतेचा भाग आहे. डाटा साम्राज्यवाद स्वीकारला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅप कंपनीचे नाव न घेता दिला आहे. ते कोलंबोमधील (श्रीलंका) कायदे मंत्र्यांच्या कॉमनवेल्थ परिषदेमध्ये बोलत होते.
रविशंकर प्रसाद यांनी डाटा संरक्षणाबाबत भारताची भूमिका कायदे मंत्र्यांच्या कॉमनवेल्थमध्ये स्पष्ट केली. ते म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डाटा हा डिजिटल अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डाटा अर्थव्यवस्था ही व्यावसायिक आणि रोजगार या दोन्हींसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
-
Representing India at the Commonwealth Law Ministers’ Meeting at Colombo.
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) November 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India’s approach to Data protection and management has been widely appreciated at this international forum. pic.twitter.com/2soA4bYvrL
">Representing India at the Commonwealth Law Ministers’ Meeting at Colombo.
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) November 6, 2019
India’s approach to Data protection and management has been widely appreciated at this international forum. pic.twitter.com/2soA4bYvrLRepresenting India at the Commonwealth Law Ministers’ Meeting at Colombo.
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) November 6, 2019
India’s approach to Data protection and management has been widely appreciated at this international forum. pic.twitter.com/2soA4bYvrL
विकसित आणि विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात डाटा निर्माण होतो. दोन्ही देशातील डाटा समान महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ मोठे देशच डाटा प्रक्रिया करण्यासाठी दावा करत आहेत. जर काही कंपन्यांनी डाटामध्ये एकाधिकार करायचा प्रयत्न केला तर ते स्वीकारले जाणार नाही, असा त्यांनी इशारा दिला.
हेही वाचा-युजर्सची गुप्तता आणि सुरक्षा ही आमची सर्वांत मोठी प्राथमिकता - व्हॉटस अॅप
लहान अथवा मोठा देश असो, त्या देशाच्या डाटा सार्वभौमत्वाचा आदर ठेवायला पाहिजे, असे प्रसाद म्हणाले. डाटा कायद्याबाबत न्यायाधीश श्रीकृष्णा समितीने काही शिफारसी सूचविल्या आहेत. त्यावर सरकारने जनतेचे मत मागविले आहे. संबंधित डाटा विधेयक लोकसभेत ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नुकतेच पीगसुस या मालवेअरने देशातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपचे हॅकिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे.