ETV Bharat / business

जीएसटीला ओहोटी! ऑगस्टमध्ये १ लाख कोटींहून कमी कर संकलन

चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा जीएसटीचे प्रमाण १ लाख कोटींहून कमी झाले आहे. जूनमध्ये जीएसटीचे संकलन हे ९९ हजार ९३९ कोटी रुपये होते.

प्रतिकात्मक - जीएसटी
author img

By

Published : Sep 1, 2019, 6:20 PM IST

नवी दिल्ली - अर्थव्यवस्था मंदावत असताना जीएसटीचे (वस्तू व सेवा कर) संकलनही घटले आहे. ऑगस्टमध्ये ९८ हजार २०२ कोटी जीएसटीचे संकलन झाले आहे. जुलैमध्ये १.०२ लाख कोटीचा जीएसटी जमा झाला होता.

चालू वर्षात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जीएसटीचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमधील संकलनाचे प्रमाण अधिक आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये ९३ हजार ९६० कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता.

हेही वाचा-देशाची ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणे शक्य - प्रणव मुखर्जी

चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा जीएसटीचे प्रमाण १ लाख कोटींहून कमी झाले आहे. जूनमध्ये जीएसटीचे संकलन हे ९९ हजार ९३९ कोटी रुपये होते.

हेही वाचा-पुरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती करणार - मुख्यमंत्री

असे आहे जीएसटी संकलनाचे प्रमाण-
केंद्रीय जीएसटी - १७,७३३ कोटी रुपये
राज्य जीएसटी - २४,२३९ कोटी रुपये
एकत्रित (इंटिग्रिटेड) जीएसटी (आयातीच्या जीएसटीह) - ४८,९५८ कोटी रुपये

हेही वाचा-पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जीएसटी माफ करा शिवसेनेची मागणी

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.