ETV Bharat / business

जीएसटीचे दर कमी करूनही मार्चमध्ये महसुलाचे प्रमाण १.०६ लाख कोटी - GST collection

जीएसटीचे अंमलबजावणी केल्यापासून सर्वात अधिक महसूल मार्चमध्ये गोळा झाला आहे. मार्च २०१८ च्या तुलनेत  मार्च २०१९ मध्ये जीएसटीच्या प्रमाणात १५.६ टक्के वाढ झाली आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 1, 2019, 7:58 PM IST

नवी दिल्ली - मार्चमध्ये जीएसटी १. ०६ लाख कोटी महसूल गोळा झाला आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. तरीही जीएसटी महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मार्च २०१९ मध्ये एकूण १ लाख ६ हजार ५७७ कोटींचा जीएसटी महसूल गोळा झाला आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटीचे प्रमाण हे २० हजार ३५३ कोटी आहे. तर राज्यांचा जीएसटी हा २७ हजार ५२० कोटी आहे. तर इंटिग्रेटेड जीएसटी हा ५० हजार ४१८ कोटी आहे.

GST collection
जीएसटी महसुलाचे प्रमाण

जीएसटीचे अंमलबजावणी केल्यापासून सर्वात अधिक महसूल मार्चमध्ये गोळा झाला आहे. मार्च २०१८ च्या तुलनेतमार्च२०१९ मध्येजीएसटीच्या महसुलाच्या प्रमाणात १५.६ टक्के वाढ झाली आहे.

२०१८-२०१९ मध्ये जीएसटी महसुलाचे मासिक सरासरी प्रमाण हे ९८ हजार ११४ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटींवरून हे ११.४७ लाख कोटी केले आहे. केंद्र सरकारचे वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) वार्षिक उद्दिष्ट हुकले आहे.

Intro:Body:

जीएसटीचे दर कमी करूनही मार्चमध्ये महसुलाचे प्रमाण १.०६ लाख कोटी

नवी दिल्ली - मार्चमध्ये जीएसटी १. ०६ लाख कोटी महसूल गोळा झाला आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. तरीही जीएसटी महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मार्च २०१९ मध्ये एकूण १ लाख ६ हजार ५७७ कोटींचा जीएसटी महसूल गोळा झाला आहे.  यामध्ये केंद्रीय जीएसटीचे प्रमाण हे २० हजार ३५३ कोटी आहे. तर राज्यांचा जीएसटी हा २७ हजार ५२० कोटी आहे. तर इंटिग्रेटेड जीएसटी हा ५० हजार ४१८ कोटी आहे.

जीएसटीचे अंमलबजावणी केल्यापासून सर्वात अधिक महसूल मार्चमध्ये गोळा झाला आहे. मार्च २०१८ च्या तुलनेत जीएसटीच्या प्रमाणात मार्च २०१९ मध्ये १५.६ टक्के वाढ झाली आहे.

२०१८-२०१९ मध्ये  जीएसटी महसुलाचे मासिक सरासरी प्रमाण हे ९८ हजार ११४ कोटी रुपये होते.  आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये जीएसटीचे उद्दिष्ट हे १३.७१ लाख कोटींवरून हे ११.४७ लाख कोटी केले आहे.  केंद्र सरकारचे वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) वार्षिक उद्दिष्ट हुकले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.