ETV Bharat / business

अर्थव्यवस्थेला झटका : सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा करसंकलनाची १९ महिन्यांतील निचांकी नोंद - GST in September

सलग दुसऱ्या महिन्यात सप्टेंबरमध्ये  १ लाख कोटींहून करसंकलन कमी झाले आहे. ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा करसंकलन ९८ हजार २०२ कोटी रुपये होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ६ हजार २८७ कोटी रुपयांचे  करसंकलन कमी झाले आहे.

प्रतिकात्मक - वस्तू व सेवा कर
author img

By

Published : Oct 1, 2019, 7:31 PM IST

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेचा दर मंदावला असताना वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन कमी झाल्याने सरकारची चिंता आणखी वाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये २ टक्के वस्तू व सेवा कराचे संकलन झाले आहे. सप्टेंबरमध्ये ९१ हजार ९१६ कर संकलन झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले.

सलग दुसऱ्या महिन्यात सप्टेंबरमध्ये १ लाख कोटींहून करसंकलन कमी झाले आहे. ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा करसंकलन ९८ हजार २०२ कोटी रुपये होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ६ हजार २८७ कोटी रुपयांचे करसंकलन कमी झाले आहे.

हेही वाचा-कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा केंद्राचा निर्णय; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

सप्टेंबरमध्ये असे झाले आहे करसंकलन (कोटी रुपयामध्ये)
केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) - १६,६३०
राज्य जीएसटी (स्टेट जीएसटी) - २२,५९८
एकत्रित जीएसटी - (इंटिग्रेटेड जीएसटी) - ४५,०६९
उपकर (सेस) - ७,६२०

जीएसटीआर-३ बी परताव्यासाठी ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ७५.९४ लाख अर्ज भरण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत वस्तू व सेवा करसंकलन २.६७ टक्क्यांनी कमी झाले आहे.

हेही वाचा-जीएसटी कपात; जाणून घ्या, काय महागणार अन् काय होणार स्वस्त!

कमी झालेल्या करसंकलनाचा असा होणार परिणाम -
केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देणासाठी सार्वजनिक खर्चात वाढ करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. अप्रत्यक्ष कराचे संकलन कमी झाले असताना सरकारच्या वित्तीय खात्यावर दबाव निर्माण होणार आहे. कॉर्पोरेट कर कमी केल्यानेही सरकारला १.४५ लाख कोटींच्या महसुली उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. अशा स्थितीत कमी झालेल्या करसंकलनाचा सरकारच्या वित्तीय गणितावरही परिणाम होवू शकतो.

हेही वाचा-स्मार्टफोनचे नवे युग: दुमडू शकणारा 'सॅमसंग फोल्ड' भारतातही; ही आहेत वैशिष्ट्ये

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.