ETV Bharat / business

कोरोनाची 'महामारी' झाल्यास जागतिक मंदीचे अरिष्ट येण्याची शक्यता

author img

By

Published : Feb 26, 2020, 2:53 PM IST

कोरोना विषाणूने चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. आता, जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे मूडीज अ‌ॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झंडी यांनी म्हटले आहे.

Corona Impact on world Economy
कोरोनाचा होणारा जागतिक परिणाम

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात महामारीचे रूप धारण केले तर जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग इटली आणि कोरियामध्ये वाढत असताना मूडीज अ‌ॅनालिटिक्सने जागतिक मंदीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोना विषाणूने चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. आता, जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे मूडीज अ‌ॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झंडी यांनी म्हटले आहे.

चीनमधील वुहानमध्ये प्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले आहे. या कोव्हिड-१९ मुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान-

कोव्हिड-१९ हा जागतिक अर्थव्यवस्थेचा विविध मार्गांनी लढा आहे. चीनचा प्रवास आणि पर्यटन व्यवसाय थांबला आहे. जागतिक विमान कंपन्या चीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत. तर आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात जहाजे जाण्यासाठी नकार देत आहेत. चीनचे ३० लाख पर्यटक हे अमेरिकेला दरवर्षी भेट देतात, असे मूडीजच्या अ‌ॅनालिटिक्समध्ये म्हटले आहे.

अमेरिकेसह इतर जागतिक प्रवासामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विदेशी पर्यटकांमध्ये चीनचे पर्यटक सर्वाधिक अमेरिकेमध्ये पैसे खर्च करतात. युरोपमधील प्रवासावरही परिणाम झाला आहे. महत्त्वाचे प्रवासी केंद्र असलेले इटलीमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

चीनमधील कारखाने बंद पडल्याने भारतासह अनेक देशांना सुट्या भागांचा पुरवठा होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. चीनमधील उत्पादक कारखान्यांची पुरवठा साखळी विसकळीत झाली आहे. यामध्ये अ‌ॅपल, नाईक आणि जनरल मोटर्स या अमेरिकन कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा-सोने प्रति तोळा होवू शकते ४७,००० हजार रुपये - मोतीलाल ओसवाल

वॉलमार्ट आणि अ‌ॅमेझॉनवरून खरेदी करणाऱ्या काही वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता असल्याचेही मूडीज अ‌ॅनालिटिक्समध्ये म्हटले आहे.

दोन आर्थिक महासत्तांच्या आयात-निर्यातीवर परिणाम

चीनमधून मागणी कमी झाल्याने अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. गेल्या वर्षी अमेरिका-चीनमध्ये पहिल्या टप्प्यातील करार करण्यात आला. त्यामध्ये चीनने अमेरिकेमधून जादा वस्तू आयात करण्याची तयारी दर्शविली होती. किती चिनी लोक अमेरिकेमधून प्रत्यक्षात आयात करणार आहेत? कोव्हिड-१९ असताना हा प्रश्न अधिकच उपस्थित होत आहे. चीन जगभरामधून खनिज तेल, तांबे, सोयाबीन आणि डुकरांचे मांस यांची मोठ्या प्रमाणात आयात करतो. ही आयात चीनकडून कमी होणार आहे. त्याचा परिणाम होणार असल्याने त्या वस्तूंचे दरही कमी होत आहेत.

हेही वाचा-क्रिकेटपटू कोहलीच्या 'विराट' ब्रँडने पुमा इंडियाचा स्पोर्ट्सवेअर व्यवसायात षटकार!

जागतिक अर्थव्यवस्थेवर आधीच आली आहेत अरिष्टे-

व्यापार युद्ध, ब्रेक्झिट निर्णय आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्वीकारलेले आर्थिक धोरण या कारणांना जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर राहिली आहे. कोव्हिड-१९ ही जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणारी आणखी एक समस्या झाली आहे. यामुळे उद्योजक नवी गुंतवणूक आणि विस्तार योजना करताना आणखी सावधगिरी घेण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे कामकाज आणखी मंद होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.