ETV Bharat / business

आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर; आर्थिक विकासदर ६ ते ६.५ टक्के राहण्याचा अंदाज

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ६ ते ६.५ टक्के विकासदर राहील असा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज व्यक्त केला आहे.

Nirmala Sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
author img

By

Published : Jan 31, 2020, 1:20 PM IST

Updated : Jan 31, 2020, 1:49 PM IST

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर केला आहे. यामध्ये पुढील आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर ६ ते ६.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विकासदर ५ टक्के राहील, असा अंदाज आहे. तर मागील आर्थिक वर्षात विकासदर हा ६.८ टक्के होता. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विकासदर ६ ते ६.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षी १०० रुपयांच्या नोटेतील रंगाप्रमाणे पाहणी अहवालाची छपाई करण्यात आली आहे.

हेही वाचा-सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्याकरता टीमचे कठोर प्रयत्न

  • काय म्हटले आहे आर्थिक पाहणी अहवालात ?
  • विकासदराला चालना देण्यासाठी उत्पादन क्षेत्रासाठी नव्या कल्पना असण्याची गरज आर्थिक पाहणी अहवालात केली. 'असेंब्ली इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेमधून रोजगार निर्मिती वाढेल, असे अहवालात म्हटले आहे.
  • उद्योगानुकलतेमधील अडथळे दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देत लालफितीचे कामकाज काढावे, अशी अहवालात शिफारस करण्यात आली आहे.
  • सरकारी बँकांमधील प्रशासन सुधारणा आणि विश्वास वाढविण्यासाठी अधिक माहिती जाहीर करण्याची गरज अहवालात व्यक्त केली आहे. बाजाराच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी पाहणी अहवालात १० कल्पना सुचविल्या आहेत.
  • कांद्यासारख्या वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने केलेला हस्तक्षेप अपुरा असल्याचे या पाहणी अहवालात म्हटले आहे.
  • संपत्तीचे वाटप आणि संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर हा विषयही अहवालात नमूद करण्यात आला आहे.

हेही वाचा-जाणून घ्या, काय असतो आर्थिक पाहणी अहवाल

Intro:Body:

Budget 01

Conclusion:
Last Updated : Jan 31, 2020, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.