ETV Bharat / business

व्हिडिओकॉन कर्जवाटप : सलग तिसऱ्या दिवशी चंदा कोचर यांची पतीसह ईडीकडून चौकशी - चंदा कोचर

ईडी या तपास संस्थेने चंदा कोचर व त्यांचे पती दीपक यांची सोमवारी आणि मंगळवारी सुमारे १७ तास चौकशी केली आहे. त्यानंतर आजही ईडीकडून कोचर यांची चौकशी करण्यात आली आहे.

चंदा कोचर
author img

By

Published : May 15, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे पती दिपक कोचर यांच्यासह त्यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून आज चौकशी करण्यात आली. व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटींचे कर्जवाटपात अनियमितता आणि नियमभंग केल्याचा चंदा कोचर यांच्यावर आरोप आहे.

चंदा या पतीसमवेत दक्षिण दिल्लीच्या खान मार्केट भागात असणाऱ्या ईडीच्या मुख्यालयात दुपारी २ वाजून २० मिनिटाला पोहोचल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना काही कागदपत्रे सोबत आणायला सांगितली होती. व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्याबरोबर असलेल्या व्यावसायिक संबंधाबाबतची चौकशी यावेळी तपास अधिकाऱ्यांनी केली. ईडी या तपास संस्थेने चंदा कोचर व त्यांचे पती दीपक यांची सोमवारी आणि मंगळवारी सुमारे १७ तास चौकशी केली आहे.

असे आहे व्हिडिओकॉनच्या कर्ज वाटपाचे प्रकरण-
व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकेडून २००९ ते २०११ दरम्यान १ हजार ८७५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये अनियमितता झाल्याचा चंदा कोचर यांच्यावर आरोप आहे.

दीपक कोचर यांची मालकीची कंपनी न्यूपॉवरच्या खात्यावर बेकायदेशीर पैशाचे हस्तांतरण झाल्याची माहिती ई़डीला मिळाली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात कोचर पती-पत्नींची मुंबईत ईडीने चौकशी केली. ईडीने मार्चमध्ये कोचर यांचे घर आणि कार्यालयाची झडतीही घेतली होती. तसेच कोचर यांच्याबरोबर व्हिडिकॉन ग्रुपचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांचीही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.

असा आहे ईडीचा दावा-
वेणूगोपाल धूत यांनी त्यांच्या सुप्रिम इनर्जी कंपनीतून कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्यूबेल्समध्ये गुंतवणूक केली. या फायद्याची परतफेड म्हणून चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज मंजूर केले. असा आरोप ईडीने कोचर यांच्यावर केला आहे. आयसीआयसी बँकेने व्हिडिओकॉनला दिलेले २ हजार ८१० कोटी रुपयांचे कर्ज एनपीए म्हणून घोषित केले आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.