मुंबई - ज्या पद्धतीने कार्टर, क्लिटंन आणि ओबामा यांनी भारत पाहिला असेल, त्याहून वेगळा भारत ट्रम्प हे २०२० मध्ये पाहणार आहेत. असे वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी
पूर्वीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, बिल क्लिटंन आणि बराक ओबामा यांच्या दौऱ्यावेळी असलेला भारत हा खूप वेगळा आहे. मोबाईल जोडणी हा महत्त्वाचा बदल आहे, याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी लक्ष वेधले. पुढे ते म्हणाले, भारत हा प्रिमिअर डिजीटल सोसायटीचा जोडबिंदू होत आहे. जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थापैकी भारत हा देश असेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-रुपया गडगडला... डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी घसरण
मोबाईल नेटवर्क हे मोठ्या परिवर्तनाचे कारण ठरत आहे. पूर्वीपेक्षा मोबाईल नेटवर्कचा वेग खूप वेगवान आहे. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये डिजीटल इंडियाचे व्हिजन दिले. त्यानंतर ३८० दशलक्ष लोकांनी जीओच्या ४ जी तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. जीओपूर्वी डाटाची गती ही २५६ केबीपीएस होती. जिओनंतर डाटाचा वेग हा २१ एमबीपीएस झाला आहे. ज्या भारतात आपण वाढलो आहोत, तो भारत येणाऱ्या पिढीसाठी हा पूर्णपणे वेगळा राहणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात ४५० अंशांनी घसरण; कोरोनाच्या प्रसाराचा परिणाम