मुंबई - सरकारी बँकांच्या थकित कर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुझलॉन एनर्जीने १८ बँकांसह भारतीय अपारंपरिक उर्जा विकास संस्थेचे (आयआरईडीए) ६ हजार ७१४.४४ कोटी रुपये थकविले आहेत. याशिवाय कंपनीने व्याजाच्या ५३८.९४ कोटी रुपयांची परतफेड केलेली नाही.
सुझलॉन कंपनीला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली १८ बँकांनी कर्ज दिले होते. तसेच अपांरपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आयआरईडीए या सरकारी संस्थेचे पैसेही कंपनीने थकविले आहेत. कंपनीने बँकांच्या थकविलेल्या कर्जासह इतर कर्ज आणि भांडवलाची शेअर बाजाराला दिली आहे.
हेही वाचा-इराण-अमेरिका तणावाची झळ; सोन्यासह खनिज तेलाच्या दराचा नवा उच्चांक
सरकारी बँका बुडित कर्जाच्या समस्येला सामोरे जात आहेत. बुडीत कर्जाचा विचार करता मार्च अखेर बहुतांश बँकांची स्थिती चांगली राहील, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते.
काय आहे एनपीए ?
कर्जदाराकडून जेव्हा कर्जावरील व्याज, मुद्दल किंवा दोन्हीही बँकेला देण्यात असमर्थता दाखविली जाते, तेव्हा ती मालमत्ता अनुत्पादक मालमत्ता (NPA) म्हणून जाहीर केली जाते.
हेही वाचा-तुर्कीवरून आयात केलेल्या कांद्याचे राज्यांना वितरण; 'हा' आहे भाव