मुंबई - आरबीआयने ०.३५ टक्के रेपो दरात कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरमध्ये ०.१५ टक्के कपात केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एसबीआयचे गृहकर्ज, कारवरील कर्ज स्वस्त होणार आहे. कर्जावरील व्याजकपातीचा निर्णय १० ऑगस्टपासून अमलात येणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पाँईटची कपात केल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय सर्व प्रकारच्या कर्जासाठी आहे. एका वर्षाच्या एमसीएलआर हा ८. ४ टक्क्यावरून ८.२५ टक्के करण्यात आला आहे.
आरबीआयने रेपो दराशी संलग्न असलेले कर्ज १ जुलैपासून देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कर्जदाराला रेपो दरातील व्याजदराच्या कपातीचा थेट लाभ घेता येणार आहे.
एसबीआयने एमसीएलआरमध्ये कपत केल्याने १० एप्रिलपासून कर्ज हे ३५ बेसिस पाँईटने म्हणजे ०.३५ टक्क्यांनी स्वस्त झाली आहेत. यापूर्वी एसबीआयने जूनच्या पतधोरणानंतर एमसीएलआर हा ५ बेसिस पाँईटने कमी केला होता.
एसबीआयकडून रेपो दरातील कपातीचा थेट फायदा ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. चालू वर्षात एकूण ८५ बेसिस रेपो दरात कपात केल्याने ग्राहकांना फायदा मिळत असल्याचे बँकेने म्हटले आहे. हा फायदा १ लाखापर्यंत कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टची सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना मिळत असल्याचेही बँकेने म्हटले आहे.