ETV Bharat / business

रिलायन्स इंडस्ट्रीजसह मुकेश अंबानी यांना सेबीकडून ४० कोटींचा दंड - मुकेश अंबानी दंड न्यूज

सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुकेश अंबानी
मुकेश अंबानी
author img

By

Published : Jan 2, 2021, 3:10 PM IST

नवी दिल्ली - शेअर बाजारातील व्यवहाराचे नियमन करणाऱ्या सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअर बॅकच्या व्यवहारात अनुचित पद्धतीचा अवलंब केल्याने सेबीने ही कारवाई केली आहे.

सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय सेबीने नवी मुंबई सेझ प्रायव्हेट कंपनीला २० कोटी आणि मुंबई सेझ लिमिटेडला १० कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या वायद्यातील शेअरचे नोव्हेंबर २०१७ मध्ये व्यवहार झाले होते. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीला ४.१ टक्के शेअर विक्री केली होती. त्यानंतर ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये २००९ मध्ये विलीन झाली होती.

हेही वाचा-इलेक्ट्रिक कार लव्हर्ससाठी वाईट बातमी, भारतात टेस्लाचे आगमन लांबणार

सेबीने ९५ पानी आदेशात रिलायन्सवरील कारवाईची माहिती दिली आहे. सेबीने आदेशात म्हटले की, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सौद्यातील शेअरच्या व्यवहारामागे काय होत आहे, हे सामान्य गुंतवणुकदारांना माहित नव्हते. त्यामुळे व्यवहाराचा रिलायन्स पेट्रोलियय सेक्युरिटीज आणि सौद्यातील शेअरच्या किमतीवर परिणाम झाला. त्यामधुन गुंतवणुकदारांच्या हितसंरक्षणाला धक्का बसल्याचे सेबीने म्हटले आहे.

हेही वाचा- खान्देशात डिसेंबर अखेरपर्यंत ९ लाख गाठींची खरेदी

दरम्यान, सेबीच्या नियमानुसार शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्यांना त्यांच्या निर्णयाची वेळोवेळी माहिती शेअर बाजाराला देणे आवश्यक असते. गुंतवणुकदारांपासून माहिती दडविली असता सेबीकडून संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात येते.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी-

अर्थव्यवस्था मंदावली असताना रिलायन्सने इंडस्ट्रीजने '२०२० फोर्च्युन इंडिया ५००' यादीत पहिला क्रमांक पटकाविण्यात यश मिळविले आहे.फोर्च्युन इंडियाने सार्वजनिक बँक इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला (आयओसी) या यादीत पहिल्यांदाच मागे टाकले आहे. गतवर्षी आयओसी यादीत प्रथम होती. रिलायन्स इंडस्ट्रीजने भांडवली मूल्यात सप्टेंबर २०२० मध्ये मैलाचा दगड गाठला आहे. रिलायन्सचे एकूण भांडवली मूल्य २०० अब्ज डॉलर झाले आहे. तर मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.