नवी दिल्ली - आरबीएल बँक आणि प्रॅक्टो यांनी भागीदारीतून आरोग्याची सेवा देणारे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. अशा प्रकारची सुविधा असलेले देशात हे पहिले क्रेडिट कार्ड आहे.
आरोग्य हेल्थ क्रेडिट कार्ड हे मास्टरकार्डशी संलग्न आहे. ते आरबीएल मोबाईल अॅपसह वेबसाईटवर तसेच प्रॅक्टोवर उपलब्ध आहे.
या आहेत क्रेडिट कार्डमध्ये सुविधा-
अर्मयादित वेळा अनुभवी आणि निष्णात डॉक्टरांकडून सल्ला घेता येणार आहे. एक दिवस मोफत आरोग्य तपासणी करता येणार आहे. कार्डचा वापर केल्यास काही पाँईट मिळणार असल्याने ऑनलाईन औषधे, विविध तपासण्या आणि ऑनलाईन सल्ला घेताना सवलती मिळणार आहेत. आरोग्यावरील खर्चात सवलत मिळविण्यासाठी ग्राहकांना चांगला पर्याय देण्यात येत असल्याचा दावा प्रॅक्टोचे उपाध्यश्र तरुण भांब्रा यांनी केला.
डिजीटल आरोग्य सुविधांची बाजारपेठ ही २०२२ पर्यंत ३७२ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचेल, असा दावा प्रॅक्टोने केला आहे. प्रॅक्टोकडून डॉक्टरांच्या अपॉईंटमेट निश्चित करण्यासाठी रुग्णांना सेवा देण्यात येते.