ETV Bharat / business

स्टेट बँक ऑफ इंडिया देणार १४ हजार नोकऱ्या; कर्मचाऱ्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती - State bank of India latest news

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेत ३० हजार १९० कर्मचारी पात्र ठरणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : Sep 8, 2020, 5:14 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीत रोजगाराचे प्रमाण कमी झाले असताना दिलासादायक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यंदा १४ हजार नोकऱ्या उपलब्ध करणार आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना एसबीआयने जाहीर केली आहे. ही योजना म्हणजे खर्चातील कपात नसल्याचेही स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेत ३० हजार १९० कर्मचारी पात्र ठरणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले, की एसबीआय ही कर्मचारीस्नेही आहे. बँके कामकाजाचा विस्तार करत आहे. बँकेला लोकांची आवश्यकता आहे. त्यामुळे यंदा १४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा-नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार; शिक्षण मंत्र्यांची माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सुमारे २.५० लाख मनुष्यबळ आहे. सुट्टीवर जाण्याची इच्छा असलेले कर्मचारी अथवा व्यावसायिक प्रगतीची मर्यादा भासणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना शारीरिक आरोग्य आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अडचणी येतात. त्यांच्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय आहे. देशातील बेरोजगारांना कौशल्य देण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे एसबीआय ही केवळ एकमेव बँक ही भारत सरकारच्या नॅशनल अॅपरियन्टशिप योजनेत सहभागी झाली आहे.

हेही वाचा-भाजप हा रावणाचा नव्हे, तर मर्यादा पुरुषोत्तमाचा पक्ष; स्वामींचा भाजपला घरचा आहेर

स्टेट बँकेच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेवर पी. चिदंबरम यांनी सोमवारी टीका केली होती. सध्याच्या असामान्य स्थितीत अर्थव्यवस्था कोसळताना नोकऱ्यांची संख्या कमी आहे. अशावेळी स्वेच्छा निवृत्त योजना म्हणजे क्रूरपणा असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.