नवी दिल्ली - क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने कार २४ कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी कंपनीमध्ये स्वतंत्र हिस्सा घेऊन भागिदारी करणार आहे. तसेच कार २४ साठी ब्रँड अॅम्बिसिडर म्हणून कामही करणार आहे.
सतत पुढे जाणे, नवे शोधणे आणि प्रत्येक समस्येवर मार्ग शोधणे हे धोनीचे गुण आहेत. त्यामुळे तो आजपर्यंत सर्वात अधिक यशस्वी कर्णधार ठरला असल्याचे कार २४ चे सहसंस्थापक आणि सीईओ विक्रम चोप्रा यांनी म्हटले आहे. कार २४ ही कंपनी धोनीच्या गुणाप्रमाणेच कार्यरत आहे. त्यामुळे धोनीबरोबरील भागिदारी ही नैसर्गिक आणि योग्य असल्याचे चोप्रा यांनी सांगितले.
हा व्यवसाय करते कार २४ कंपनी-
कार २४ ही कंपनी २०१५ मध्ये स्थापन झाली. कारची विक्री आणि खरेदी करणारे हे मोठे माध्यम आहे. कंपनी लवकरच फ्रँचाईज मॉडेल सुरू करणार आहे. देशातील श्रेणी - २ आणि इतर बाजारपेठेत कंपनी विक्री वाढविणार आहे.
दरम्यान, धोनी आणि कार २४ मधील कराराची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. कार २४ चे देशातील २३० शहरामध्ये १० हजार व्यावसायिक भागिदार आहेत. कंपनीच्या ३५ हून अधिक शहरात १५५ हून अधिक शाखा आहेत. कंपनीमध्ये सेक्वोअिया इंडिया, एक्झॉर सीड्स, डीएसटी ग्लोबल, किंग्जवे कॅपीटल आमि केसीके कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.