ETV Bharat / business

मारुती सुझुकीकडून १ हजार हंगामी कर्मचाऱ्यांना नारळ, नोकर भरतीही थांबवणार - Temporary employees

केवळ मारुती सुझुकीच नव्हे तर इतर कंपन्यांच्या वाहन विक्रीतही घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन प्रकल्पासह किरकोळ विक्रीतील रोजगाराचे प्रमाण कमी होत आहे.

मारुती सुझुकी
author img

By

Published : Aug 4, 2019, 1:24 PM IST

नवी दिल्ली - सध्या, मागणी कमी होत असल्याने वाहन उद्योग मंदीमधून जात आहे. याचा फटका रोजगार निर्मिती होत असल्याचे दिसत आहे. मारुती सुझुकीने १ हजार हंगामी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. नोकरभरती थांबविण्याचे नियोजनही मारुती सुझुकीकडून करण्यात येत आहे.

सूत्राच्या माहितीनुसार पहिला फटका हंगामी कर्मचाऱ्यांना बसला आहे. मात्र कंपनीने त्याबाबात प्रतिक्रिया दिलेली नाही.

केवळ मारुती सुझुकीच नव्हे तर इतर कंपन्यांच्या वाहन विक्रीतही घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन प्रकल्पासह किरकोळ विक्रीतील रोजगाराचे प्रमाण कमी होत आहे. मारुती सुझुकी इंडियाने पहिल्या तिमाहीत ३३.५ टक्के वाहनांची विक्री कमी झाल्याचे गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
मारुती सुझुकीच्या निर्यातीतही ९.४ टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा कमी होवून १ हजार ४३५.५ कोटी झाला आहे. वाढता खर्च व विक्रीचे घटलेले प्रमाण याचा नफ्यावर परिणाम झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.