ETV Bharat / business

महिंद्रा आणि महिंद्राच्या एकूण वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये २१ टक्क्यांची घसरण - sales of Vehicles

महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्राच्या वाहनांची सप्टेंबरमध्ये ४३ हजार ३४३ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी  सप्टेंबरमध्ये महिंद्राच्या ५५ हजार २२ वाहनांची विक्री झाली होती. महिंद्राच्या वाहन निर्यातीतही २९ टक्के घट झाली आहे.

संग्रहित - वाहन उद्योग
author img

By

Published : Oct 1, 2019, 2:48 PM IST

नवी दिल्ली - देशातील वाहन उद्योग अजून मंदीमधून बाहेर पडलेला नाही. देशातील वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राच्या एकूण वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये २१ टक्के घट झाली आहे.

सप्टेंबरमध्ये महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्राच्या ४३ हजार ३४३ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये महिंद्राच्या ५५ हजार २२ वाहनांची विक्री झाली होती. महिंद्राच्या वाहन निर्यातीतही २९ टक्के घट झाली आहे. चालू वर्षात सप्टेंबरमध्ये २ हजार ५१ वाहनांची निर्यातीसाठी विक्री झाली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये ३ हजार ७५४ वाहनांची निर्यातीसाठी विक्री झाली होती.

हेही वाचा - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू

अशी झाली महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत घसरण

प्रवासी वाहनांच्या प्रकारामध्ये १४ हजार ३३३ उपयोगी (युटिलिटी) वाहने, कार आणि व्हॅनची विक्री झाली आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये २१ हजार ४११ वाहनांची विक्री झाली होती. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३३ टक्के एवढी मोठी घसरण झाली आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १८ टक्के घसरण झाली आहे. चालू वर्षाच्या सप्टेंबरमध्ये १८ हजार ८७२ वाहनांची तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये २२,९१७ वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर मात्र पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच

सणासुदीच्या काळात विक्रीबाबत आशावादी असल्याचे महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्राचे विक्री आणि विपणन प्रमुख विजय राम नक्रा यांनी म्हटले आहे. हा नवरात्र सण आमच्यासाठी व वाहन उद्योगासाठी चांगला असेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. चांगला झालेला मान्सून आणि सरकारने सकारात्मक केलेल्या सुधारणांमुळे उद्योगाला कमी वेळेत चालना मिळायला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा - पेट्रोल पंपावरील 'ही' सवलत आजपासून बंद; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.