ETV Bharat / business

जिओ ५जी सेवा पुढील वर्षी सुरू करणार  -मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, की ५जी यंत्रणा चालू करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. ही यंत्रणा परवडणाऱ्या दरात आणि सर्वत्र उपलब्ध व्हावी, असेही अंबानी म्हणाले.

मुकेश अंबानी
मुकेश अंबानी
author img

By

Published : Dec 8, 2020, 3:14 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स जिओने पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ५जी सेवा लाँच करण्याचे नियोजन केले आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली. ते इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, की ५जी यंत्रणा चालू करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. ही यंत्रणा परवडणाऱ्या दरात आणि सर्वत्र उपलब्ध व्हावी, असेही अंबानी म्हणाले.

मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की, भारतामधील ५जी क्रांतीत जीओ अग्रेसर असणार आहे. त्यासाठी स्वदेशी नेटवर्क हार्डवर्क आणि तंत्रज्ञानाच्या सुट्ट्या भागांचे बळ मिळणार आहे. जीओची ५जी सेवा ही महत्त्वाकांक्षी ध्येय असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानची चाचणी ठरणार आहे.

संबंधित बातमी वाचा-जिओचे स्वदेशी 5जी तंत्रज्ञान तयार; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

स्मार्टफोनचा वापर २जी फोनचा वापर करणाऱ्या ३०० दशलक्ष वापरकर्त्यांनी करावा, यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप करावा, अशी अंबानी यांनी मागणी केली. डिजीटल संपर्क यंत्रणा असलेल्या जगभरातील उत्कृष्ट देशांपैकी भारत आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. हे ३०० दशलक्ष वापरकर्ते हे २जी फोनच्या वापरात अडकून पडले आहेत. सेमीकंडक्टरच्या निर्मितीत देशात हब तयार करणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहणे शक्य नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचा-५जीच्या दहापट ६जीचे वेगवान इंटरनेट; 'या' देशात सुरू करण्याचे प्रयत्न

कोरोनाच्या संकटामुळे ५जी सेवेला उशीर

दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, सध्याचा स्पेक्ट्रम हा देखील '५जी'ची सेवा सुरू करण्यासाठी पुरेसा आहे. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञाच्या माहितीनुसार, कमी डाटा देण्यासाठी सुमारे ३२० मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमची आवश्यकता असते, तर वेगवान गतीने डाटा देण्यासाठी ६७० मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमची आवश्यकता असते. केंद्रीय दूरसंचार विभागाने २०२० मध्ये ५जी सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे हे उद्दिष्ट हुकले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.