ETV Bharat / business

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा; इंडियन बँकेकडून १०२ जणांना नोकरी

author img

By

Published : May 28, 2021, 10:27 PM IST

इंडियन बँकेच्या सीईओ पद्मजा छुंद्रू म्हणाल्या, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुर्दैवाने बँकेच्या ११४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी कुटुंबांतील १०२ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती केली आहे.

इंडियन बँक
इंडियन बँक

चेन्नई - इंडियन बँकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कॅनरा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. मृत्यू झालेल्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इंडियन बँकेने नोकरी दिली आहे.

दरम्यान, इंडिया बँकेने मार्च तिमाही अखेर १,७०८.८५ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. ही माहिती इंडियन बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मार्च तिमाही अखेर इंडियन बँकेला २१७.७४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

हेही वाचा-जीएसटी परिषद : कोरोना उपचारावरील औषधांना केंद्रीय जीएसटी माफ- निर्मला सीतारामन

अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनीकरण

इंडियन बँकेची विलिनीकरणापूर्वीची केवळ आर्थिक स्थिती ३१ मार्च २०२० पर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२० आणि मार्च २०२१ यांच्यामध्ये आर्थिक कामगिरीची तुलना करता येत आहे. अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत १ एप्रिल २०२१ ला विलिनीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा-आरबीआयने एचडीएफसीला ठोठावला १० कोटी रुपयांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.