ETV Bharat / business

हार्ले डेव्हिडनसच्या दुचाकींची हिरो मोटोकॉर्प करणार विक्री; दोन्ही कंपन्यांमध्ये करार - हिरो मोटोकॉर्प न्यूज

हिरोचे देशभरात डीलरशीपचे जाळे आहे. या जाळ्याचा वापर करून हार्ले डेव्हिडसनच्या वाहनांची विक्री करण्यात येणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे.

हिरो मोटोकॉर्प
हिरो मोटोकॉर्प
author img

By

Published : Oct 27, 2020, 6:50 PM IST

नवी दिल्ली - हिरो मोटोकॉर्प आणि अमेरिकेची दुचाकी कंपनी हार्ले डेव्हिडसन या दोन्ही कंपन्यांनी वितरणासाठी करार केला आहे. हिरो मोटोकॉर्पकडून हार्ले डेव्हिडसनच्या सुट्ट्या भागांची विक्री आणि सेवा देण्यात येणार आहे.

हिरोचे देशभरात डीलरशीपचे जाळे आहे. या जाळ्याचा वापर करून हार्ले डेव्हिडसनच्या वाहनांची विक्री करण्यात येणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे. हार्ले डेव्हिडसन कंपनीने देशातील बिझनेस मॉडेल बदलले आहे. त्यानुसार हे पाऊल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा करार देशातील दुचाकीस्वारांसाठी ठरेल, असे हार्ले डेव्हिडसनने म्हटले आहे.

हिरो मोटोकॉर्प बाजारात आणणार प्रिमियम दुचाकी

हार्ले डेव्हिडसनचा देशात ब्रँड प्रसिद्ध आहे. तर हिरो मोटोकॉर्पचे देशात बळकट असे वितरण जाळे आणि चांगली ग्राहक सेवा आहे. हार्ले डेव्हिडसन ब्रँडच्या नावाने हिरो मोटोकॉर्प प्रिमियम दुचाकी बाजारात आणणार आहे.

दरम्यान, हार्ले-डेव्हिडसन कंपनीने सप्टेंबरमध्ये देशात वाहनांचे उत्पादन आणि विक्री थांबविण्याचा निर्णय जाहीर केला. दशकभरापूर्वी कंपनीने देशात वाहनांचे उत्पादन आणि विक्री करण्यास सुरुवात केली होती.

हिरो मोटोकॉर्पने ऑनलाईन दुचाकी विक्री सुरू-

सर्वच वस्तू ऑनलाईन मिळत असताना हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांना दुचाकीही ऑनलाईन देण्यास ऑगस्टमध्ये सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणाऱ्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने विक्री वाढविण्यासाठी खास ऑफरही जाहीर केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.