ETV Bharat / business

सावधान ! तुमच्या प्रत्येक खरेदीवर गुगल ठेवते नजर

मोबाईल अॅपच्या होमपेजवर जाहिराती दाखविण्यात येणार असल्याचे गुगलने १४ मार्चला जाहीर केले होते. या अॅड डिस्कव्हर विभागामध्ये दिसणार आहेत. याशिवाय फोटोंच्या मदतीने गॅलरी अॅड या नावानेही गुगल जाहिराती दाखविणार आहे.

गुगल
author img

By

Published : May 18, 2019, 5:08 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - गुगलकडून वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रत्येक व्यवहारावर गुगलची नजर असते. त्यासाठी गुगलने खास टूल तयार केले आहे.

खरेदीच्या माहितीचा ट्रॅक ठेवण्यासाठी व सोप्यारीतीने पाहण्यासाठी खासगी टूल तयार केल्याचे गुगलने म्हटले आहे. ही माहिती ग्राहकांना कधीही काढून टाकता येते, असा दावा गुगलने केला आहे. गुगलच्या मेसेजमधील माहितीचा उपयोग अॅड दाखविण्यासाठी केला जाणार नाही. यामध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या पावतीचा समावेश असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. हे टूल किती दिवस कार्यरत राहील हे अद्याप गुगलने जाहीर केले नाही.

गुगल ऑनलाईन जाहिराती वाढविणार -
मोबाईल अॅपच्या होमपेजवर जाहिराती दाखविण्यात येणार असल्याचे गुगलने १४ मार्चला जाहीर केले होते. या अॅड डिस्कव्हरमध्ये दिसणार आहेत. याशिवाय फोटोंच्या मदतीने गॅलरी अॅड या नावानेही जाहिराती गुगल दाखविणार आहे. गुगल शॉपिंगच्या होमपेजवर वैयक्तिकरीत्या आणि फिल्टर असलेल्या जाहिराती दिसणार आहेत. गुगलने २०१७ मध्ये जीमेलमधून वापरकर्त्यांचा डाटा गोळा करणे बंद केले असल्याचे जाहीर केले होते.

Intro:Body:

Business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.