ETV Bharat / business

गो एअरची देशातील १८ विमान उड्डाणे रद्द; प्रवाशांना मन:स्ताप - Airline service affected

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन कामकाज विस्कळीत झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, किती विमान सेवा रद्द झाल्या आहेत, याची कंपनीने माहिती दिलेली नाही.

गो एअर
GoAir
author img

By

Published : Dec 23, 2019, 7:19 PM IST

मुंबई - गो-एअरच्या विमान प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. कंपनीने देशातील १८ विमाने उड्डाणे आज रद्द केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि पाटणामधील विमान सेवांचा समावेश आहे.

स्वस्त दरात विमान सेवा देणाऱ्या गोएअरला नुकतेच काही विमानांतील इंजिनमधील त्रुटीमुळे अडचणींना सामारे जावे लागले होते. गो एअरने मुंबई, गोवा, बंगळरू, दिल्ली, श्रीनगर, जम्मू, पाटना, इंदूर आणि कोलकातामधून जाणारी विमान उड्डाणे रद्द केली आहेत. विमानातील आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विमान उड्डाणे झाल्याचे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-दागिन्यांना भाववाढीची झळाळी; सोने १८७ तर चांदी ४९५ रुपयांनी महाग

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन कामकाज विस्कळित झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, किती विमान सेवा रद्द झाल्या आहेत, याची कंपनीने माहिती दिलेली नाही.हवामान, कमी दृश्यता आणि देशातील विविध भागात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू झाल्याने विमान उड्डाणे विस्कळित झाल्याचे गोएअरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच केबीन क्रु कर्मचाऱ्यांना काम करण्याची मर्यादा (एफडीटीएल) असल्यानेही सेवा विस्कळित झाल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा-भाववाढ रोखण्याची कसरत; आयातीच्या ७९० टन कांद्याची देशात आवक

पहाटे ४ वाजून ५५ मिनिटाला विमान उड्डाण होणार होते. गोएअरने रात्री पावणेदोन वाजता विमान उड्डाण झाल्याचे कळविल्याचे एका विमान प्रवाशाने ट्विटमध्ये म्हटले आहे. येत्या २४ तासात कळवू, असे कंपनीने म्हटले. त्यानंतर मी काय करू? कोणत्याही हेल्पलाईवरून उत्तर देण्यात आलेले नाही, असे ट्विटमध्ये प्रवाशाने म्हटले आहे.

हेही वाचा-कंपनी व्यवहार मंत्रालयाची एनसीएलएटीमध्ये धाव; 'तो' शब्द वगळण्याची विनंती

प्रवाशांची कमीत कमी गैरसोय होण्यासाठी शक्य ती पावले उचलल्याचे गोएअरने म्हटले आहे. ग्राहकांना पर्यायी विमान सेवा देण्यात येत आहे. तसेच मोफत विमान तिकीट रद्द करणे आणि पुनर्नोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.