नवी दिल्ली - नवीन वर्षात फोर्डच्या किमती वाढणार आहेत. फोर्ड इंडियाने १ जानेवारीपासून वाहनाच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढविणार असल्याचे आज जाहीर केले. वाहनासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे फोर्डने म्हटले आहे.
फोर्डच्या किमती १ ते ३ टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती ५ हजार ते ३५ रुपयापर्यंत मॉडेलप्रमाणे वाढणार आहेत. ही माहिती फोर्ड इंडियाचे कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेवा) विनय रैना यांनी दिली.
सुट्ट्या भागांची किंमत वाढल्याने वाहनांचे दर वाढविणे गरजेचे होते. मात्र, ज्यांनी २०२० मध्ये वाहनाची बुकिंग केली आहे, त्यांच्यासाठी नवे दर लागू होणार नाहीत. मारुती सुझुकी इंडियानेही वाहनांच्या किमती जानेवारीपासून वाढविण्याचे बुधवारी जाहीर केले आहे. मारुती सुझकी आणि फोर्डच्या किमती या मॉडेल निहाय वाढणार आहेत.
हेही वाचा-कोरोना लस वाहतुकीकरता स्पाईसजेटचा ओम लॉजिस्टिक्सबरोबर करार
गतवर्षी वाहने निघाली होती सदोष-
दरम्यान, फोर्ड इंडियाने २२ हजार ६९० प्रिमीअम एसयूव्ही इंडेव्हर परत घेण्याचा निर्णय गतवर्षी जुलैमध्ये जाहीर केला होता. या वाहनामध्ये असलेल्या एअरबॅग इनफ्लेटरमध्ये दोष आहे की नाही, याची कंपनीने तपासणी केली होती.