नवी दिल्ली - कॉर्पोरेट क्षेत्राने वर्ष २०१४-१५ पासून सीएसआरसाठी १० हजार कोटी रुपये खर्च केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. कंपन्यांनी समाज कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी हा अनाथ आणि दिव्यांगांसाठी खर्च करावा, असे त्यांनी आवाहन केले. राष्ट्रपती हे पहिल्या सीएसआर पुरस्कार समारंभात बोलत होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, कंपनी कायद्यात २०१३-१४ मध्ये सुधारणा करण्यात आली. कंपन्यांना ठराविक नफा मिळाल्यानंतर त्यामधील २ टक्के हिस्सा सीएसआरवर खर्च करावा लागतो. अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी सीएसआर निधी खर्च करण्यासाठी आणखी मार्गांचा विचार करायला हवा. २०३० पर्यंत प्रत्येक दिव्यांगांची काळजी घेतली जाईल.
हेही वाचा-टाटा मोटर्सचे शेअर १७ टक्क्यांनी वधारले; भांडवली मुल्यात ७ हजार १०३ कोटींची वाढ
सीएसआर उपक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उदरनिर्वाह, जलसंवर्धन, स्वच्छता आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सीएसआरचा शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, गरिबी निर्मूलन, पोषण आहार, स्वच्छता आणि शुद्ध पाण्याच्या पिणे यावर खर्च केल्याने विशेषत: आनंद झाल्याचे राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले.
काय आहे सीएसआर-
पाच कोटींपेक्षा जास्त नफा कमविणाऱ्या उद्योजक, व्यापारी बिल्डरांना त्यांच्या नफ्यातील दोन टक्के रक्कम सामाजिक उत्तरदायित्वासाठी खर्च करणे बंधनकार आहे. हा खर्च सीएसआर म्हणून ओळखला जातो.