ETV Bharat / business

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; पंतजली, कोकसह पेप्सीला कोट्यवधींचा दंड - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ न्यूज

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन शिवदास मीना यांनी कोक, पेप्सीको, पंतजली आणि बिसलेरीसह विविध कंपन्यांना पत्र पाठवून दंड ठोठावल्याची नोटीस दिली आहे. कंपन्यांनी विस्तारित उत्पादक जबाबदारीचे (ईपीआर) पालन केले नसल्याचे सीपीसीबीने नोटीसमध्ये म्हटले आहे.

कंपन्यांना दंड
कंपन्यांना दंड
author img

By

Published : Feb 10, 2021, 8:07 PM IST

नवी दिल्ली - प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन न करणाऱ्या काही कंपन्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कोक, पेप्सीको, पंतजली आणि बिसलेरीसह विविध कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापन करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा सीपीसीबीने ठपका ठेवला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन शिवदास मीना यांनी कोक, पेप्सीको, पंतजली आणि बिसलेरीसह विविध कंपन्यांना पत्र पाठवून दंड ठोठावल्याची नोटीस दिली आहे. कंपन्यांनी विस्तारित उत्पादक जबाबदारीचे (ईपीआर) पालन केले नसल्याचे सीपीसीबीने नोटीसमध्ये म्हटले आहे. सीपीसीबीने कंपन्यांना दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मदत दिली आहे. सीपीसीबीने पतंजलीला फेब्रुवारीमध्ये पत्र पाठविले होते. मात्र, पंतजली कंपनीने ऑगस्टपर्यंत उत्तर दिले नव्हते. राष्ट्रीय हरित लवादाने सीपीसीबीला पतंजलीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीपीसीबीने पंतजलीला दंड ठोठावला आहे.

हेही वाचा-रुपया वधारल्याचा परिणाम; सोन्याच्या दरात अंशत: घसरण

असा ठोठावण्यात आला आहे दंड

  • कोका कोला-५०.६६ कोटी रुपये
  • कोका कोला बेव्हरेजेस -५०.६६ कोटी रुपये
  • बिसलेरी -१०.७५ कोटी रुपये
  • पेप्सीको इंडिया होल्डिंग्ज -८.७ कोटी रुपये
  • पतंजली -१ कोटी रुपये

हेही वाचा-बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीचा छापा

काय आहे विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) नियम

विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) या नियमानुसार उत्पादकांना प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट आणि त्याच्या जीवनसाखळीपर्यंतचे व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.