ETV Bharat / business

गतवर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत जानेवारीत ८ टक्के घसरण - वाहन विक्री

वाहन उद्योगांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. वाहनांच्या वाढणाऱ्या किमती आणि राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदरात घसरण झाल्याने वाहनांची विक्री कमी होत असल्याचे एसआयएएमने म्हटले आहे.

Auot sales
वाहन विक्री
author img

By

Published : Feb 10, 2020, 9:05 PM IST

नवी दिल्ली - कर्जाचे व्याजदर कमी करूनही वाहन विक्रीत वाढ झालेली नाही. जानेवारीतील वाहन विक्रीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी झाले आहे. जानेवारीत गतवर्षीहून १४ हजार ५३१ वाहनांची कमी विक्री झाली आहे.

वाहन उद्योगांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. वाहनांच्या वाढणाऱ्या किमती आणि राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदरात घसरण झाल्याने वाहनांची विक्री कमी होत असल्याचे एसआयएएमने म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाचा भारतीय औषधी उद्योगावर परिणाम होण्याची भीती

केंद्र सरकारने पायाभूत सुविधा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे वाहन विक्रीत वाढ होण्यासाठी मदत होईल, असे एसआयएएमचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, वाहन उद्योगाने गतवर्षी मंदी अनुभवली होती.

हेही वाचा-केंद्र सरकारकडून सर्जिकल मास्कसह हातमोज्यांवरील निर्यात बंदी रद्द

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.