नवी दिल्ली - कोरोनाच्या काळातही ह्युदांईने वाहन विक्रीत मोठे यश मिळविले आहे. ह्युदांईने मोटर इंडियाच्या एसयूव्ही क्रेटाने विक्रीत १.२१ लाखांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
ह्युदांई कंपनीने गतवर्षी मार्चमध्ये क्रेटा लाँच केली होती. वर्षभरातच हे मॉडेल एसयूव्ही श्रेणीमध्ये विक्रीत आघाडीवर आले आहे. कंपनीने २०१५ पासून क्रेटाच्या ५.८ लाख वाहनांची देशात विक्री केली आहे. तर २.१६ लाख वाहनांची विविध देशांच्या बाजारपेठांमध्ये निर्यात केली आहे.
हेही वाचा-'भारतीय रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नाही'
ह्युदांई मोटर इंडियाचे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले की, नवीन क्रेटाने भारतीय वाहन उद्योगामध्ये नवा मापदंड निर्माण केला आहे. त्यामुळे हे मॉडेल एसयूव्हीमध्ये सर्वाधिक आवडीचे झाले आहे. आपले हुशार भारतीय ग्राहक हे ह्युंदाई कारची निवड करणे सुरुच ठेवतील, असा विश्वास आहे.
हेही वाचा-हिरोच्या ५० हजार इलेक्ट्रिक वाहनांची वर्षभरात विक्री