ETV Bharat / business

जागतिक पर्यटन दिन २०२०: भविष्याबाबत पुनर्विचार करण्याची संधी - जागतिक पर्यटन दिन विशेष न्यूज

कोरोनाच्या महामारीने पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेतला आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Sep 27, 2020, 5:46 AM IST

मुंबई - पर्यटन क्षेत्र हे संस्कृती टिकविणे आणि वारसा जपण्यासाठी जगभरात महत्त्वाची भूमिका पार पडते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संस्थेकडून दरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.

पर्यटन क्षेत्राचे जागतिक स्तरावर महत्त्व कळावे, यासाठी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटन क्षेत्राकडून जागतिक विकास आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात योगदान देण्यात येते. कोरोनाच्या संकटात पर्यटन क्षेत्राच्या भविष्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पर्यटन दिनाचा इतिहास

इंटरनॅशनल युनियन ऑफ ऑफिशियल ट्रॅव्हल ऑरगायनेझेशनने (आययूओटीओ) २७ सप्टेंबर १९७० ला विशेष अधिवेशन मेक्सिकोमध्ये बोलाविले होते. या अधिवेशनात जागतिक पर्यटनाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यटन संस्थेने सप्टेंबर १९७९ ला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरात पहिल्यांदा २७ सप्टेंबर १९७० ला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.

हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरता सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का?

पर्यटन क्षेत्राचे रोजगारात योगदान

⦁ संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संस्थेच्या अंदाजानुसार जगभरातील पर्यटकांच्या भ्रमंतीत ५८ ते ७८ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

⦁ पर्यटन क्षेत्रामधून १० पैकी एका व्यक्तीला रोजगार देण्यात येतो. कोरोना महामारीमुळे थेट १०० ते १२० दशलक्ष पर्यटन नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

⦁ ग्रामीण भागातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे तीन पटीने जास्त आहे. अशावेळी पर्यटन क्षेत्र ही जीवनवाहिनी आहे. तरुणांना स्थलांतरित न होता संधी उपलब्ध होण्यासाठी पर्यटन हा चांगला पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा-केंद्राकडून जीएसटी मोबदला उपकराचा चुकीच्या पद्धतीने वापर; कॅगचा ठपका

भारतामधील पर्यटन क्षेत्रावर एक दृष्टीक्षेप

⦁ जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांकात भारताचा २०१९ मध्ये १४० देशांच्या यादीत ३४ वा क्रमांक आहे. ही यादी जागतिक आर्थिक मंचने जाहीर केली होती.

⦁ देशातील पर्यटन उद्योगाचे भारताच्या सकल उत्पादनात ९.२ टक्के योगदान आहे. तर देशातील एकूण रोजगारात ८ टक्के योगदान आहे.

⦁ इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या अभ्यासानुसार पर्यटन आणि मुल्यवर्धित साखळीमधील ४२ लाख नोकऱ्या धोक्यात आहेत.

⦁ केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील देशांनी पर्यटन क्षेत्र खुले करताना काळजी घेतली आहे. त्याचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.