ETV Bharat / business

आर्थिक आघाडीवर महाराष्ट्र पुन्हा अव्वल करणार - अजित पवार - अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्याची उद्योग आणि सेवा क्षेत्रात पिछेहाट झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात राज्याच्या बेरोजगारीची स्थिती खूप खराब झाली आहे. हा सर्व चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Mar 6, 2020, 9:47 AM IST

मुंबई - 'राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२०' विधानसभेत सादर केल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी राज्याला आर्थिकबाबतीत पुन्हा एकदा अव्वल करणार असल्याचे अर्थमंत्री पवार यांनी गुरुवारी सांगितले.

राज्याची उद्योग आणि सेवा क्षेत्रात पिछेहाट झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात राज्याच्या बेरोजगारीची स्थिती खूप खराब झाली आहे. हा सर्व चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता नोव्हेंबर २०१९ मध्ये आली आहे. हे सरकार चुका दुरुस्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातल्या अनेक बाबी चिंताजनक आहेत. उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार, जीडीपी अशा आघाड्यांवरची घसरण गंभीर आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रातलं महाराष्ट्राचं अव्वल स्थान पुन्हा मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्नशील आहे.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-महा'अर्थ': जीडीपीत अव्वल असलेला महाराष्ट्र बेरोजगारीत सर्वप्रथम

महाराष्ट्र कृषी, उद्योग, शिक्षण आणि विदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणणार असल्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-महा'अर्थ' : कर्जाचा डोंगर ५ लाख कोटींहून अधिक; विकासदर ५.७ टक्के गाठण्याची अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.