नवी दिल्ली - कारखान्यांमध्ये कमी असलेले कामगार आणि ट्रकची वाहतूक हे जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळे आहेत. ही माहिती आयटीसी, डाबर इंडिया आणि पारले प्रॉडक्ट्स आदी कंपन्यांनी दिली आहे.
महामारी कोरोनामुळे संसर्गाला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित होण्यासाठी केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे उत्पादन प्रकल्पांसाठी उद्योगांना परवाने मिळविणे सोपे झाले आहे. तसेच कच्च्या मालाची आणि उत्पादनांची वाहतूक करणे सोपे झाले आहे.
डाबर इंडिया कार्यकारी संचालक शाहरुख खान म्हणाले, मुख्य समस्या ही मनुष्यबळाची आहे. कामकाज चालविण्यासाठी कामगार लागतात. बहुतांश कामगार हे त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे काम सुरळित चालू ठेवणे आव्हान आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन : जीवनावश्यक वस्तुंसाठी ६०.९ टक्के भारतीयांना मोजावे लागताहेत जादा पैसे
आयटीसीचे प्रवक्ते म्हणाले, की ट्रक उपलब्ध होणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. पारले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ प्रमुख मयांक शाह म्हणाले, की मनुष्यबळ हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण कामगार हे उपस्थित नाहीत. उत्पादन प्रकल्पांमध्ये बहुतांश स्थलांतरित मजूर आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा कऱण्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा-राज्याभरात १ एप्रिलपासून पुढच्या ५ वर्षांसाठी वीज होणार स्वस्त