ETV Bharat / business

महामारीने अनेकांपुढे जगण्याचे प्रश्नचिन्ह; १० पैकी एकाने गमाविली नोकरी

author img

By

Published : May 28, 2020, 11:14 AM IST

नोकरी डॉट कॉमने विविध क्षेत्रात नोकरी करणाऱ्या ५० हजार कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ७० टक्के कर्मचारी हे चांगल्या संधी असलेल्या नोकरीच्या शोधात आहेत. वेतन कपातीमुळे १६ टक्के लोक तर नोकरी गमाविण्याच्या भीतीने १४ टक्के लोक नोकरीच्या शोधात आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - महामारीचा फटका बसल्याने अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोकरी डॉट कॉमच्या सर्वेक्षणानुसार देशातील १० पैकी एकाने नोकरी गमावली आहे. तर १० पैकी ३ जणांना नोकरी गमाविण्याची भीती आहे.

नोकरी गमाविलेल्या १० टक्के लोकांपैकी १५ टक्के लोक हे विमान कंपन्यांमध्ये आणि ई-कॉमर्स उद्योगामध्ये कार्यरत होते. तर १४ टक्के लोक हे लोक आदरातिथ्य उद्योगात (हॉस्पिटिलिटी इंडस्ट्रीज) होते. नोकरी गमाविणाऱ्यांमध्ये १३ टक्के लोक हे ११ वर्षांचे अनुभवी आणि वरिष्ठ पदावर आहेत. त्यामध्ये विक्री (१२ टक्के), मनुष्यबळ आणि प्रशासन (१२ टक्के), मार्केटिंग (११ टक्के) आणि पुरवठा साखळीत (११ टक्के) कर्मचारी होते.

हेही वाचा-गुगलची कार्यालये 'या' दिवशीपासून होणार सुरू; कर्मचाऱ्यांना अतिरिक्त हजार डॉलर

नोकरी डॉट कॉमने विविध क्षेत्रात नोकरी करणाऱ्या ५० हजार कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ७० टक्के कर्मचारी हे चांगल्या संधी असलेल्या नोकरीच्या शोधात आहेत. वेतन कपातीमुळे १६ टक्के लोक तर नोकरी गमाविण्याच्या भीतीने १४ टक्के लोक नोकरीच्या शोधात आहेत. आयटी, औषधी, वैद्यकीय या क्षेत्रांमध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेत कर्मचारी कपातीचे प्रमाण कमी आहे.

हेही वाचा-सोने खरेदीकडे का असतो महिलांचा कल?; जागतिक सोने परिषदेने हे दिले उत्तर

नोकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन गोयल म्हणाले, हे सर्वेक्षण नोकरी बाजारपेठेतील भविष्यातील दृष्टीकोनासाठी सावध करण्याकरता व्यापक दिशा देणार आहे. या सर्वेक्षणामध्ये १० टक्के लोकांना नोकरीतून काढल्याचे दिसून आले आहे. तर ३४ लोकांना नोकरी जाण्याची भीती असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा-टाळेबंदीच्या संकटातही व्यवसाय संधी; मास्क विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.