नवी दिल्ली - ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी पेट्रोल-डिझेल दरवाढ आजही सुरुच राहिली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७४.६१ रुपये आहे. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरपासून पेट्रोलचा हा सर्वात अधिक दर आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ६७.४७ रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर सोमवारी स्थिर राहिले. तरीही देशात पेट्रोल-डिझेलचे आज दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर दिल्लीत १९ पैशांनी, मुंबईत १३ पैशांनी, कोलकाता आणि चेन्नईत १४ पैशांनी वाढले आहेत. डिझेल दर दिल्लीत १६ पैशांनी, कोलकातामध्ये १० पैशांनी, मुंबईत १२ पैशांनी आणि चेन्नईत ११ पैशांनी वाढले आहेत.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू
इंडियन ऑईलच्या वेबसाईटप्रमाणे असे आहेत पेट्रोलचे आजचे दर
शहर | पेट्रोलचा दर प्रति लिटर रुपयात |
दिल्ली | ७४.६१ |
कोलकाता | ७७.२३ |
मुंबई | ८०.२१ |
चेन्नई | ७७.५० |
हेही वाचा-पेट्रोल पंपावरील 'ही' सवलत आजपासून बंद; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
इंडियन ऑईलच्या वेबसाईटप्रमाणे असे आहेत डिझेलचे आजचे दर
शहर | डिझेलचा दर प्रति लिटर रुपयात |
दिल्ली | ६७.४९ |
कोलकाता | ६९.८५ |
मुंबई | ७०.७६ |
चेन्नई | ७१.३० |
सौदी अरेबियामधील दोन तेल शुद्धीकरण प्रकल्पावर १३ सप्टेंबरला ड्रोन हल्ला झाला होता. त्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. याचा परिणाम म्हणून १७ सप्टेंबरपासून पेट्रोलचा दर वाढत आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरावर या घटकांचा होतो परिणाम-
भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांकडून जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीचा रोज आढावा घेतला जातो. या कच्च्या तेलाच्या दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्या निश्चित करतात. रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण, कच्च्या तेलाचे वाढलेले दर, वाढती मागणी आणि जागतिक आर्थिक मंचाची स्थिती यांचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होत असतो.
हेही वाचा-केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 'एवढे' घेणार कर्ज