मुंबई - विदेशी गुंतवणुकदारांनी निधी काढून घेतल्याने व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. आयटीसी, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक ५४.०६ अंशाने घसरून ३७,८२८.७३ वर पोहोचला. तर निफ्टी ३९.५० अंशाने घसरून ११,२४४.८० वर पोहोचला. केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला सादर केल्यानंतर शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटत असल्याचे एंजेल ब्रोकिंगचे समित चव्हाण यांनी सांगितले. शेअरची घसरण असली तरी ही संधी घेण्याची चांगली वेळ असल्याचे चव्हाण यांनी मत व्यक्त केले.