मुंबई - तुम्ही घराचे स्वप्न पाहत असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात ७० बेसिस पाईँटपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना गृहकर्ज हे ६.७ टक्के इतक्या कमी दरापासून पुढे मिळू शकणार आहे.
स्टेट बँक ही गृहकर्जाच्या पुरवठ्यात आघाडीवर असलेली बँक आहे. बँकेकडून व्याजदरात कपात झाल्यानंतर ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गृहकर्ज मिळणार आहे. तसेच कर्ज घेतलेल्यांच्या मासिक हप्त्यात कपात होणार आहे.
हेही वाचा-खादी ग्रामोद्योगाची झेप; आठच महिन्यात ऑनलाईन विक्रीतून १.१२ कोटींची उलाढाल
अशी मिळणार गृहकर्जावर सवलत
- देशात ग्राहकांना सर्वाधिक कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कात ३१ मार्चपासून १०० टक्के सवलत दिली आहे. ग्राहकांना सीबीलच्या गुणांप्रमाणे गृहकर्जावरील व्याजात सवलत मिळणार आहे.
- ज्यांच्याकडून कर्जाची वेळेवर परतफेड होते, त्यांना कर्जाच्या व्याजदरात सवलत देणे महत्त्वाचे असल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे.
- नव्या व्याजदराप्रमाणे स्टेट बँकेचे गृहकर्ज ७५ लाखांपर्यंत असल्यास ६.७ टक्के व्याज तर ७५ लाखांहून अधिक गृहकर्ज असल्यास ६.७५ टक्के व्याज दर असणार आहे.
- ग्राहक हे घरातून योनो अॅपद्वारे गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यांना योनो अॅपद्वारे गृहकर्जावरील व्याजदरात ५ बेसिस पाँईटची सवलत मिळणार आहे.
- तर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्जदारांना व्याजदरात ५ बेसिस पाँईटची सवलत दिली जाणार आहे.
हेही वाचा-खूषखबर! कोरोनाविरोधातील लस खासगी रुग्णालयात मिळणार फक्त २५० रुपयांत!
स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक
स्टेट बँक ही ठेवी, शाखा, ग्राहक संख्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या याबाबतीत देशातील सर्वात मोठी बँक आहे. नुकतेच बँकेकडून देण्यात आलेल्या गृहकर्जाचे प्रमाण हे ५ लाख कोटींहून अधिक झाले आहे.