ETV Bharat / business

कर्ज घेणे झाले स्वस्त, एसबीआयच्या व्याजदरात ५ बेसिस पाँईटची कपात

गृहकर्जावरील व्याजदरात १० एप्रिल २०१९ नंतर एकूण १५ बेसिस पाँईटची कपात झाल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : May 11, 2019, 1:02 PM IST

नवी दिल्ली - तुम्ही जर गृहकर्ज अथवा इतर कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेणार असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. ही कपात ५ बेसिस पाँईटने करण्यात आली आहे.

एमसीएलआरशी निगडीत सर्व कर्जावरील व्याजदर हा १० मे २०१९ पासून ५ बेसिस पाँईटने कमी होणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या एप्रिलमधील पतधोरणानंतर एसबीआयने दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. यामुळे वार्षिक व्याजदर हा ८.५ टक्क्यावरून ८.४५ टक्के होणार आहे. गृहकर्जावरील व्याजदरात १० एप्रिल २०१९ नंतर एकूण १५ बेसिस पाँईटची कपात झाल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

ओव्हर ड्राफ्टचे व्याजदर रेपो दराशी संलग्न-
एसबीआयने १ लाखांहून अधिक असलेले कॅश क्रेडिट आणि ओव्हर ड्राफ्टचे व्याजदर हे १ मेपासून रेपो दराशी संलग्न केले आहेत. हा बदल आरबीआयच्या धोरणामुळे करण्यात आला आहे. एसबीआयला आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील चौथ्या तिमाहीदरम्यान ८३८.४० कोटींचा नफा झाला आहे. तर आर्थिक वर्ष २०१७-२०१८ मधील जानेवारी-मार्च तिमाहीत एसबीआयला ७ हजार ७१८ कोटी १७ लाख रुपयांचा तोटा झाला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.